Thursday, 21 October 2021

पोलिसांच्या घरात वाढताना

 पोलिसांच्या घरात वाढताना

अलोक पवार

लहानपणापासून समाजात वाढताना आपल्याला काही गोष्टींकडे बघून चेहऱ्यावर एक प्रसन्नता येते, काहींना बघून एक भीती निर्माण होते आणि ही प्रसन्नता, भीती किंवा कोणताही अविर्भाव समाजाने शिकवलेला असतो. पण प्रत्येकाला असाच अनुभव येतो असे नाही. 

असाच एक आणि माझ्या माहितीनुसार गैरसमज म्हणजे पोलीस दिसले की भीती. अरे पण ती कोणाला वाटली पाहिजे जो गुन्हेगार आहे त्याला ना. ज्याने काहीच केले नाही त्याला कशाला भीती पाहिजे. मला आज लिहावेसे वाटले दादांबद्दल. दादा म्हणजे आमचे श्री अरविंद पांडुरंग काळे. मी शिक्षकी पेशा निवडला होता आणि एका खाजगी क्लासमध्ये शिकविण्यास सुरवात केली होती. सर्व विद्यार्थी मला पाहून सर म्हणायचे पण एका गोंडस मुलाने का माहिती का पण सर म्हणायच्या ऐवजी दादा म्हणले. म्हणजे तिथे मला खूपच आवडले. आणि त्याने त्याच्या घरी येण्याचे म्हणून मला आमंत्रण दिले. विद्यार्थ्याने बोलावले तर मला लगेच अगदी नाही म्हणता नाही आले आणि मीही गेलो हसत हसत. त्या विद्यार्थ्यांचे वडील पोलीस खात्यात होते, मी देखील या क्षेत्रात सुरवात केली होती त्यामुळे दिसायला देखील लहानच होतो. त्याचे वडील म्हणजेच दादा अगदी साध्या वेशात होते. त्याला शिकवताल का थोडं घरी येऊन असे मला सहजच विचारले त्यांनी. हो अडले तर नक्की काहीच हरकत नाही असे मी चटकन बोललो. 



मी त्याला शिकवायला सुरवात केल्याच्या नंतर अगदी संध्याकाळी देखील दादा क्वचितच घरी दिसायचे. मला अगदी चांगले आठवते गणपतीचे दिवस होते. मला दादा बोलणाऱ्या त्या बालकाची लहान भावंड अश्विनी आणि अक्षय अगदी शाळेत जात होते. गणपतीच्या दिवसात वडिलांनी आपल्याला मंडळांचे गणपती बघायला घेऊन जावे अशी इच्छा प्रत्येक लहानग्यांची होते मात्र यांचे वडील गणपतीत घरी नाही त्यांची दर दिवशी ड्युटी गणपतीच्या बंदोबस्ताला. मला चांगले आठवते मी त्या दोघांना घेऊन अगदी गर्दीतून हात धरून गणपती बघायला घेऊन गेलो होतो बाजूला पोलीस बंदोबस्त देखील होता मुलांचे वडील कुठे दिसतात का हे मी शोधत होतो, पण दादांची सेवा वेगळ्या ठिकाणी होती. 

कदाचित ही कहाणी प्रत्येक पोलीस पाल्याची असेल, सुरवातीलाच शपथ घेऊन काम सुरू करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घर, कुटुंब, बायको आणि मुले असतात. पण नाते कुठेतरी हरवली जातात. दादा या नात्यांना जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते पण नेहमीच ड्युटी महत्वाची. गणपतीत नाही, दिवाळीत नाही. मुलांना सुट्टी पण दादांना कुठे सुट्टी भेटते. मुलांचे वाढदिवस देखील दादांच्या शिवाय. अगदी त्यांचा वाढदिवस साजरा करावा येतो येतो म्हणून तोही उशिरा येण्याच्या नादात डोळे कधी मिटून जायचे सांगता येत नव्हते. 

दादांचे मला अतिशय कौतुक वाटायचे, दादांनी ज्या आरोपींना पकडले ते आरोपी देखील दादांशी अगदी सौजन्याने वागायचे. ज्या चुका केल्या आहेत त्या कशा सुधारायच्या हे दादा त्यांच्याशी अगदी पुरेपूर बोलायचे. आणि या गप्पा करताना कधीतरी दादांमधील कौन्सिलर अगदी सहज दिसायचा. आणि मग हेच गुन्हेगार अगदी त्यांच्या सणांना घरी बिर्याणी, दालचा देऊन जायचे. दादांसमोर त्यांची पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची काय बिशाद असल्याची पुढे. तेच भीती ही त्यांनाच होती आणि आमच्या समोर ते अगदी रोल मॉडेल होते. टीव्ही वरचा सीआयडी मधला एसीपी प्रदूमन सर्वानी बघितला असेल मात्र दादा हे सर्व रिअल आयुष्यामध्ये खरेखुरे होते. गुन्हे विश्व, गुंडगर्दी, भाई गिरी, चोऱ्यामाऱ्या या सर्व गोष्टींशी दादांचे सहज डील व्हायचे. 

कधी तर असे व्हायचे साधे पाणी पण गुन्हेगार शोधताना प्यायला भेटणे मुस्किल व्हायचे. उतारवयात याच गोष्टीं चा आरोग्यावर, हृदयावर बराच त्रास व्हायचा पण हा जवान थांबतोय कुठे. एके दिवशी छातीत दुखतंय म्हणून मी डॉक्टर कडे घेऊन गेलेलो, डॉक्टरांनी औषध लिहून दिल्यावर निदान दोन दिवस बेडरेस्ट घ्या असे सांगूनही औषध घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी ड्युटीवर हजर असे आमचे दादा.

असा नेहमी वैतागलेला, त्रासलेला, ज्याला घर असूनही घर नशीब न झालेला, कुटुंब आहे पण कुटुंबाच्या प्रेमाला तरसलेला हा व्यक्ती. सर्वच पोलीस कुटुंबियांची ही शोकांतिका असेल. आज पोलीस स्मृती दिन. म्हणजे अगदी शहिद झालेल्या पोलिसांना पण आठवावे. पण दादांसारख्या पोलिसांच्या उमेदीच्या काळातल्या त्यांना कुटुंब न मिळालेल्या आठवांनीना मी उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. आज दादा रिटायर्ड झालेत. याच वर्षी एकसष्टी गाठली पण त्यांच्या आणि त्यांच्या सारख्याच बऱ्याच पोलीस वीरांचे बलीदान आठवणीत आणण्याचा हा दिवस. १९५९ मध्ये लडाख मधील चीन बरोबरच्या युद्धात केंद्रीय दलातील राखीव जवान शहीद झाले होते त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस असतो. आपण नॉर्मल आयुष्य जगावे म्हणून स्वतः आयुष्य अबनॉर्मल करून घेणारे हे पोलीस वीर. दादांच्या रूपाने यांचे आयुष्य नक्की काय आहे किती खडतर आहे ते कळले.

दादा हॅट्स ऑफ यु.

दादा love You...♥️

अमोल धन्यवाद माझ्या आयुष्यात दादा आणण्यासाठी...

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी डॉ. अलोक पवार भारतात जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रचना तयार केली तेंव्हा वेळोवे...