भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी
डॉ. अलोक पवार
भारतात जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रचना तयार केली तेंव्हा वेळोवेळी भारतीय बाजारपेठ अधिकाधिक प्रबळ कशी होईल याचा विचार केला गेला. ब्रिटिश भारतात त्याच बाजारपेठेचा भाग म्हणून इथे आले आणि भारतावर राज्य केल. त्या ब्रिटिशांना इथून हाकलायचे आणि मग विविध क्रांती घडवून आणायची, हा येथील सर्वांचाच विषय होता. भारत स्वातंत्र झाला. भारत जसा स्वातंत्र झाला तसे भारतामध्ये हरित क्रांती, श्वेत क्रांती, औद्योगिक क्रांती निर्माण झाली. या सर्व क्रांती भारताच्या विकासासाठी अगदी महत्वाच्या ठरल्या. याचं क्रांती च्या यादीमध्ये एक महत्वाची क्रांती आपले स्थान निर्माण करते ते म्हणजे तंत्रज्ञान क्रांती. भारताचे नववे पंतप्रधान राजीव गांधी त्या तंत्रक्रांतीचे प्रणेते म्हणायला हरकत नाही.
एखाद्या लहान मुलाला गाड्या खेळणे, त्यांना खोलण्याचा छंद असतो ना तसाच राजीवजी गांधी यांना यांत्रिक उपकरणे खोलणे आणि पुन्हा जोडणे असा छंद होता. त्यांचा हाच छंद त्या यंत्रा विषयीची उत्कंठा दाखवून देत. इलेक्ट्रॉनिक विषयातच त्यांची रुची अधिक होती. १९७४ साली त्यांनी बाजारातून विविध यंत्रे आणून घरच्या घरी एक रेडिओ निर्माण केला होता. खर तर नेहरू आणि इंदिरा गांधी घराण्यातील तिसरी पिढी असल्याने घरात निवांत बसायचे किंवा राजकारणात सक्रिय राहायचे असा कोणताच गुणधर्म राजीवजी यांच्यात नव्हता त्यांना राजकारणात अजिबातच रस नव्हता असे म्हणायला हरकत नाही. त्यांचे मन या इलेक्ट्रॉनिक्स च्या विश्वात रमायचे.
राजीव गांधी जेंव्हा व्यवसायिक वैमाणिक म्हणून काम करायचे तेंव्हा ते कधी कधी संपूर्ण दिवस मुंबईमध्ये थांबायचे. याचं दरम्यान त्यांची ओळख प्रभाकर देवधर यांच्याशी झाली. तेंव्हा देवधर यांच्याकडे असलेला बीबीसी स्पेक्ट्रम हा कॉम्प्युटर बघायला भेटला. देवधर यांनी पुढे एपलॅब नावाची कंपनी देखील टाकली. तो कॉम्प्युटर आणि ती कंपनी या दोन्ही गोष्टींमुळे देवधर आणि राजीवजी यांच्यात चांगलीच गट्टी जमली. भारतामधील इलेक्ट्रॉनिक ची परिस्थिती कशी आहे, बाकीच्या देशांची कशी आहे, कोणता देश इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविण्यात आघाडीवर आहे हे त्यांना कळायला सुरवात झाली. कोरिया आणि तैवान सारखे देश या बाबतीत भरीव प्रगती करित होते. भारत मात्र स्वावलंबन या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत असल्याने त्या देशांतून इलक्ट्रॉनिक वस्तू भारतात विक्री साठी उपलब्ध नव्हत्या. भारतातूनच भारताच्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी निर्यात करण्यासाठी भर दिला जायचा. त्यासाठी मुंबई तील सांताक्रूझ येथे सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्स्पोर्ट प्रोससिंग झोनची निर्मिती झाली होती. राजीवजी या सर्व गोष्टीमध्ये अधिक उत्सुकता दाखवायचे. मात्र बाहेरील विश्वात काय चालू आहे यात भारत निरुत्साही होता भारतातील आयात धोरण व्यवस्थित नव्हते यातून राजीव जी अतिशय अस्वस्थ झाले होते.
१९८२ सालच्या एशियाड स्पर्धेची जवाबदारी इंदिरा गांधी यांनी राजीव यांना सोपावली.तेंव्हा त्यांनी दिल्लीच्या नॅशनल इन्फॉर्मेट्रिस सेंटर ला भेट दिली. अशी माहिती केंद्रे फक्त दिल्लीपुरतीच मर्यादित नं राहता संपूर्ण भारत भर अशी केंद्रे स्थापन झाली पाहिजेत हा त्यांनी विचार मांडला. आशियाड स्पर्धेची सर्व माहिती कॉम्प्युटर द्वारा अद्ययावत करा अशीही सूचना त्यांनी केली. त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर परदेशातून आयात करावे अशी इच्छा व्यक्त केल्यावर मात्र एन. आय. सी.च्या अधिकाऱ्यांनी हे आयात करण्यापेक्षा इथेच त्याची निर्मिती व्हावी असे फिक्स केले. एन.आय.सी. कडून त्याचे निर्माण झाले. यापुढे आयतवरील धोरणे बदलली. कर यंत्रणा सुधारली.काही मोठे कर रद्द देखील करण्यात आले.
३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यावर राजीव गांधी यांना पंतप्रधान पदाची धुरा आपल्या हातात घ्यावी लागली. त्यांच्या या पंतप्रधान पदाच्या कालावधीत ते कॉम्प्युटर आणि दुरसंचार आणि एकूणच सर्व तंत्रज्ञान क्षेत्रात ते मोठी कामगिरी करतील याची सर्वच भारताला खात्री होती. त्यांच्या कालावधीत सॉफ्टवेअर क्षेत्राकडे सर्वजण उद्योग म्हणून बघू लागले. एकंदरीत भारतामध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्रीची आज जी झगमगाट दिसते आहे ती सुरवात तेंव्हा झाली होती.१९८६ मध्ये राजीव गांधी यांनी पुन्हा एन. आय.सी. ला एका महत्वाच्या कामाला जंपले. गरीब जनता किंवा ग्रामीण जनतेला सरकार कडून जी मदत केली जाते किंवा जी कामे केली जातात त्याचा आढावा घेतला जातो त्याची माहिती मिळवता येईल का यासाठी कॉम्प्युटर चा वापर केला गेला. सर्वेक्षण करण्यात आले. खरे तर संख्यिकीय तथ्य म्हणजेच अनालायसिस त्या काळात केले गेले. त्या सर्व गोष्टींवरून राजीव गांधी यांना मिळवता कळाली की एक रुपयांची मदत ही लोकांपर्यंत पाठवली तर त्यातील १५ पैसेच त्यांच्या पर्यंत पोहोचतात. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांचे संशोधन हे तंत्रज्ञानाने पुढे पोहोचले होते. कॉम्प्युटर चा मोठ्या प्रमाणात वापर रेल्वे आरक्षण आणि बँकिंग सेक्टर मध्ये देखील झाला पाहिजे ही पुढे त्यांची इच्छा होती. प्रत्यक्षात त्यांनी या गोष्टी करून देखील दाखवल्या.
भारतातील सध्याचे जे प्रबळ आयटी सेल आहे किंवा जे अत्याधुनिक तंत्रज्ञान दिसून येते त्याची सुरवात ही राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत झाली. राजीव गांधी यांनी आपली आवड त्यांच्यापुर्ति मर्यादित नं ठेवता संपूर्ण भारताची गरज लक्षात घेऊन विकास साधला. भारतामध्ये संगणक शिक्षणाची सुरवात देखील त्यांच्या याचं प्रयत्नातून पुढे येताना दिसतात.
राजीव गांधींच्या याचं व्हिजन मुळे आजही ते लक्षात राहतात. राजीवजींच्या जयंतीला त्यांना सादर प्रणाम...
