Thursday, 20 May 2021

गुरुलिंग उर्फ आबा मिटकरी .....

गुरुलिंग उर्फ आबा मिटकरी ......

प्रा. पवार अलोक अर्जुन अलका 

घरावर आभाळ होते. घरी खाणारी तोंड भरपूर होती आणि कमावणारे हात कमी होते. त्यामुळे फक्त आठवी पर्यंतचे शिक्षण झालेल्या गुरुलिंग मिटकरी यांनी देखील बीडमधील लोणीघाट गावातील आपले घर सोडून थेट पुणे गाठल. मोठा भाऊ पाठीशी होता, मात्र सगळच शिकायचं होते. भावाच्या मदतीने पुण्यातील प्रेमनगर या झोपडपट्टी वसाहतीमधील एक छोटेसे किराणामालाचे दुकान चालवायला घेतले. अवघे आठवीपर्यंतचे शिक्षण घेतलेला हा बालक चक्क दुकान अगदी व्यवस्थित चालवत होता. आणे आणे जोडून अगदी हिशोबाने सर्व सांभाळत होता. मात्र पुण्यासारख्या शहरात कुठे काय भागतंय, आणि गावाकडे पण पैसा पाठवायचा मग पैसा अजून कमावणे गरजेचे होते. भावाला पण मदत करणे गरजेचे होते. 



त्या काळी त्यांचे मोठे म्हणजेच वडीलबंधू वसंतराव मिटकरी यांनी साबणाच्या व्यवसायात पाय रोवले होते. औरंगाबादच्या साबणाचे पुणे आणि सातारा सारख्या भागात वितरण करण्याचा हा व्यवसाय जोमाने वाढत होता. सुरवातीला अगदी संपूर्ण घर कामाला लागायचे. मग साबणाची गाडी आली कि तिला खाली करण्याच अगदी थकवणार काम असायचं. पण हे दोघे भाऊ एकमेकांना अगदी राम - लक्ष्मणासारखे सांभाळून घ्यायचे. मग हा साबण उतरवताना पाठ दुखून यायची पण पुणे आणि साताऱ्यात हा गोडावून मध्ये उतरवलेला माल विकला जायचा आणि पुन्हा मागणी यायची तेंव्हा पाठीवरच दुखण झटक्यात गायब व्हायचे. आठवी मध्ये भले शाळा सोडली असेल पण विपणनाचे (मार्केटींगचे) खऱ्या आयुष्यातील धडे आबांनी मस्त सुरु केले होते. आपला साबणाचा माल विकला कसा जाईल. दुकानदार पुन्हा मालाची मागणी कसे करेल याचे खरेखुरे प्रात्यक्षिक आबांनी सुरु केले होते. 

प्रेमनगर नंतर गुलटेकडी ला पण एक भाड्याचे दुकान झाले. मात्र मार्केटयार्ड परिसरात स्वतःचे देखील दुकान असावे म्हणून गुरुकृपा नावाचे एक दुकान सुरु झाले. आबा आपल्या लहान भाऊ म्हणजे शंकर मिटकरी यांच्यासोबत या दुकानाचे काम बघू लागले. मात्र मार्केट मध्ये दुकान म्हणजे भूसाराचे दुकान झालेच पाहिजे म्हणून जिद्दीने आबांनी शोधमोहीम सुरु केली आणि २००० साली मार्केट मध्ये स्वतचे भुसार चे दुकान त्यांनी सुरु केले..... 'शिवकृपा

आई - वडील, वडीलबंधू आणि परमेश्वराची सेवा करणे हे महत्वाचे आहे. या हेतूने आबा नित्यनियमाने रोज आपल्या परमेश्वराचे म्हणजेच शिवाचे आपल्या आई वडिलांचे दर्शन घेऊन रोज कामाला लागतात. कामाला मुल थकतील मात्र आबांचा चेहऱ्यावर कधी थकवा जाणवत नाही. आबा अगदीच धार्मिक व्यक्ती. देवाची पूजा त्यांच्याकडून कधीच चुकली नाही. लोणीला असताना महिन्यातून एकदा कपिलधारच्या शिवाच्या देवस्थानाला ते अगदी कधी चालत तर कधी सायकलवर दर्शनास जात. पुण्यात आल्यावर पण कामाच्या व्यापातूनही ते देवास प्राधान्य देऊन पूजा - अर्चना करूनच कामाला सुरवात करतात. मग त्यासाठी भुसार मार्केट मधील हा व्यापारी सकाळी सकाळी नक्कीच फुलांच्या मार्केट मध्ये दिसतो यात शंका नाही. स्वतःचा शोध घेणे, आपण काय कमावले आणि काय गमावले हे पण बघितले पाहिजे आणि त्यासाठी आत्मपरीक्षण केले पाहिजे. कमावणे आणि गमावणे या फक्त पैशांमध्ये अडकलेल्या गोष्टी नाहीत तर इतरही गोष्टी असतात त्यांचेही परीक्षण व्हावे म्हणून आबा नेहमी सकाळी ध्यान धारणा करतात. वैश्विक मोहामध्ये अडकून न जाता आपले आणि आपल्या सहवासातील सर्वांचे आयुष्य सुकर कसे करता येईल यासाठी या ध्यानधारणेतून ते नेहमीच एक शोध घेत असतात. आबांनी पुढे ब्रम्हविद्या आत्मसात केली. श्वसनाचे सर्व प्रकार माहिती करून घेतली पाहिजे. आपली फुफ्फुसे नेहमीच प्रबळ झाली पाहिजेत हा त्यांचा ब्रम्हविद्येतील शिक्षणाचा प्रकार आज कोरोनाच्या काळात नक्कीच उपयोगी पडतो आहे. 

आबांना एकूण तीन मुले. सागर, अक्षय आणि नंदिनी. तिन्ही मुले पदवीपर्यंत शिक्षण घेऊन मोठी झाली. तसे आबांनी आपल्या तिन्ही मुलांवर सारखेच प्रेम म्हणावयास हरकत नाही. पण आपली मुलगी नंदिनी हिच्याविषयी विशेष लिहावेसे वाटते. मुलगी जन्मली की एक ना एक दिवस तिचे लग्न लावून दिले जाते. मग तिला परक्याच्या घरी पाठवून दिले जाते. असे जरी असले नंदिनी ज्यावेळी अठरा वर्षाची झाली तेंव्हाच लगेच नात्यांमधून तिला स्थळ यायला सुरवात झाली. काही मुलींना स्वतहून शिक्षणात आवड नसते. मात्र नंदिनी ची स्वतची शिक्षणातली आवड ओळखून आबांनी तिला विचारले तुला काय करायचे आहे लग्न की शिक्षण. तेंव्हा शिक्षणाचा स्वीकार करणाऱ्या नंदिनीच्या मागे आबा एका मोठ्या पर्वतासारखे उभे राहिले. आधी शिक्षण झालेच पाहिजे. मुलांना पदवी दिली मग मुलगी कोणत्याही परिस्थितीत मागे राहता कामा नये यासाठी तिला देखील आबांनी प्रथम शिक्षण पूर्ण करण्याची मुभा दिली. आबांची दोन्ही मुले सागर आणि अक्षय तर पदवीधर बनून आबांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या हाताशी आलेले आहेत. 

आबा नेहमी आम्हाला म्हणतात आमचे दुकान म्हणजे एक मोठे विश्वविद्यालय आहे. इथे आम्हाला सर्व शिकायला भेटते. मुलांना देखील मी तेच शिकवतो. आबांच्या शिवकृपा मध्ये गेल्यावर याची जाणीव नक्कीच आल्याशिवाय राहत नाही.आबा जेंव्हा भुसार दुकानात गहू तांदूळ मागवतात ना तेंव्हा supply chain व्यवस्थापनाचा अभ्यास होतो. ते जेंव्हा ग्राहकांशी हितगुज करतात ना तेंव्हा त्यांची मार्केटिंग स्टाईल कळते. जेंव्हा तिथे हिशोब होतो ना तेंव्हा अकौंटंट सुद्धा फिका पडेल इतके सरस हिशोब असतात. त्याच्याकडे आलेला कर्मचारी काय त्यांना सोडून जाईल यावरून त्याचे ह्युमन रिसोर्स देखील मजबूत दिसते. आबांच्या दुकानात ग्राहक, दुकानदार, कर्मचारी, ड्रायव्हर सर्वाची रेलचेल दिसते. सर्वांशी हसतमुखाने बोलणे त्यांना आपुलकीने वागविणे यातून त्यांचे बिसिनेस कम्मुनिकेशन तर शिकावे असेच आहे. दुकानातील रोजच्या व्यवहारांचा बँकेशी कसा ताळमेळ घालून द्यायचे यामधून त्यांचे बँकिंग पण अगदी परफेक्ट असे दिसून येते. एकंदरीत आबा म्हणजे वाणिज्य विषयाचे एक चालते बोलते विश्वविद्यालय म्हणायला खरेच हरकत नाही. 

आबांची आणखीन एक नवीन ओळख सध्या बघायला भेटली ती म्हणजे प्राण्यांवरची भूतदया. आबांच्या दुकानात ग्राहकांशिवाय आणखीन एका समूहाची रेलचेल बघायला भेटते ती म्हणजे अनाथ गाय - बैलांची. खर तर अस्सल शेतकरी कुटुंबातील आबा गाय - बैलांशी आपली नाळ कशी तोडतील. त्यामुळे जेंव्हा जेंव्हा हा गोतावळा आपल्या दुकानाकडे आलेला दिसतो आबा अगदी कौतुकाने त्या सर्वाना भरपेट असा आपल्या दुकानातील गहू खाऊ घालतात. माणूस तोंडाने मागून खातो पण या मूक जनावरांची भटक्या जनावरांची भाषा समजणारे आबा काहीशे वेगळेच. 



सध्या कोरोनाचे संकट सर्वांवर कोसळले आहे. मात्र कोणाची शिधा थांबता कामा नये म्हणून आबा कधीही कोरोनाला घाबरून घरी बसले नाहीत. शासकीय नियमांप्रमाणे त्यांनी नेहमीच आपले शिवकृपा दुकान उघडे ठेवले. मात्र बऱ्याचदा लांबून आलेले ड्रायव्हर यांना हॉटेल बंद असल्याने जेवणाची पंचायत होते. अशा वेळी आबांनी सध्या निदान आठवड्यातून एकदा दोनदा खिचडीभात आणि गोड शिरा अशी मेजवानी या मेहनती लोकांना अगदी मोफत वाटप करतात. यात अगदी गरीब लोकही येऊन आबांच्या मेजवानीत सहभागी होतात. 

असे हे गुरुलिंग उर्फ आबा आमच्या श्री स्वराज एज्युकेशन सोसायटीचे सदस्य आहेत. असे बॉस मला मिळणे म्हणजे माझे अहोभाग्यच. म्हणजे त्यांनी मला कधीच मी त्यांचा कर्मचारी आहे म्हणून न स्वीकारता आपल्या घरातील सदस्य म्हणून स्वीकारले आहे, तेही तितकेच महत्वाचे. 

आज आबा वयाची ५१ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा. त्याचे जीवन थोडेसे आखायला भेटले असे भरपूर, गोड क्षण मला पुढेही लिहायला भेटो आणि मला अशीच त्यांची साथ लाभो हीच शिवाकडे प्रार्थना....               

13 comments:

  1. Wish you many many happy returns of the day sir he is very very calm person I have never seen the calm and kind person like him may god bless you with long and healthy life sir ☺️

    ReplyDelete
  2. Thanks a lot sir but may I know what is your good name

    ReplyDelete
  3. Wish you a very blessed birthday Guruling Aba..i share very special relationship with Aba as we are classmate from 1st to 8th and same native place as Loni .. He is very soft spoken and kind hearted Man.. I still remember our childhood days when he was use to sit in their village kirana store and i use to visit him and he always gave me biscuits n chocolates as a friend ... Awesome memories of childhood days 🎉 May god bless you 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. जुन्या आठवणी... चॉकलेट आणि बिस्किटांच्या... एकदम ताज्या झाल्या

      Delete
  4. Wish you happy birthday AABAA

    ReplyDelete
  5. शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्वाची पूर्ण जीवनाची कहानी... खरच खुप छान 👌HAPPY BIRTHDAY आबा 🎂💐🎁🍫

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद महेशजी नगरे सर...

      Delete
  6. अनेकानेक शुभेच्छा.���� संजय साठे, ब्रह्मविद्या साधक संघ.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद संजयजी साठे सर

      Delete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. As a girl child, it soothes me so much and makes me feel proud of my father, as he supports me in my qualitative education, I am always thankful to the God that he is blessed with such lovely hearts, I really respect the glory he has earned in his life...I can recall some memories he's shared with me- during post-drought situation and bizzare poverty, he had to clean the Veranda of a Marwari lady (Kaki ji) and she used to give him one-fourth of Bhakri (roti made of sorghum), which used to be the treat after taking efforts. It still enchants me whenever I think of the facilities and support we get nowadays, it was missing in his life,but still he achieved the best.
    The STRUGGLE was REAL.
    People always see the delicious food in the plate, but never count the efforts taken to blend a good recipe with perfect ingredients to bring in the heavenly taste. Same goes with life, people always,unfortunately,look at the glory and riches of a person,but only few have the eyes to gaze at the hidden secrets of their success mantra- patience, perseverance and determination - covered under the layers of struggle and up-downs of life.
    Thank you very much Mr. Alok Pawar sir, the principal of Swaraj College, Dhankawadi, I really appreciate your vision of introducing 'the man of principles' and his early life, his achievements, his happiness. Mr. Guruling Rameshwar Mitkari-my dad- might haven't achieved hundreds of crores in his assets, but I can proudly say that he has earned hundreds of thousands of good souls in his life. As he says - "मी पैश्यांनी जरी प्रचंड श्रीमंत नसलो, तरी माझ्या माणसांची सोबत हीच माझ्यासाठी श्रीमंती आहे."

    - Nandini Guruling Mitkari

    ReplyDelete

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी डॉ. अलोक पवार भारतात जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रचना तयार केली तेंव्हा वेळोवे...